कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. श्रीमती मेधा खरे व त्यांच्या समूहाने गणेश वंदना सादर केली. त्यानंतर श्रेया ताम्हणकर व त्यांच्या समूहाने लावणी सादर केली. डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेली लावणी, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायिका सावनी रवींद्र यांनी सुरेखपणे गायली. हिंदू कॉलनी मराठी संस्कृती मंच यांनी लाठी-काठीचे सादरीकरण केले. श्रीमती शुभांगी घाटणेकर (पूर्वज ब्रँड) यांनी वैदिक फॅशन शो सादर केला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या पद्मश्री डॉ. सोमा घोष उपस्थित होत्या. विशेष पाहुणे म्हणून आधा शंकराचार्य त्रिकाल भवंत सरस्वती जी, डॉ. मंजूषा कुलकर्णी तसेच अधिवक्ता ईशा अग्रवाल उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध सिमरन आहुजा यांनी केले. या सोहळ्यात पुढील मान्यवरांना “महाराष्ट्र श्री सन्मान” प्रदान करण्यात आला: श्री अविनाश शारदा प्रल्हाद धर्माधिकारी श्रीमती शुभांगी घाटणेकर डॉ. उज्ज्वला चाकरदेव श्रीमती निशिगंधा वाड श्रीमती सावनी रविंद्र पद्मश्री डॉ. अशोक गुप्ता श्री सुनील पाल श्री विलास परब श्री दीपक रणनवरे पंडित शौनक अभिषेकी श्री राहुल घोष डॉ. प्रकाश टाटा श्रीमती उषा दत्त श्री ताहेर चित्तलवाला श्री अजीत मन्याल डॉ. संदीप बिप्टे श्री कृष्णा हेगडे श्री प्रतीक मोहन शर्मा डॉ. अर्चना शर्मा अधिवक्ता चंद्रप्रकाश श्रद्धा श्री सिद्धार्थ देशपांडे श्रीमती पूजा सावंत श्री अमरप्रीत तान श्री केवल कुमार श्री संजीव कुमार (स्वदेश न्यूज) आचार्य श्री अरविंद श्रीमती मधु लाखोटिया श्री शुभंकर घोष श्री फैसल नविवाला यांना “महाराष्ट्र श्री सन्मान” प्रदान करून गौरविण्यात आले. मनरंग LLP चे संचालक श्रीरंग मोहोळकर आणि डॉ. राजेश श्रीवास्तव यांच्या वतीने “महाराष्ट्र श्री सन्मान” सोहळा आयोजित करण्यात आला. Post navigation Indian Masters Chef Vicky Sav Own Style Unique Recipe Signature Dish Has The Distinction Of Working With Many Popular Restaurants कौन है भाजपा नेता एडवोकेट विनय कुमार दुबे जिन्हें शहीदी दिवस पर राष्ट्रीय वीरता पुरस्कार किया गया प्रदान i