logo

Love is in the air for Gashmir and Spruha!

logo
Love is in the air for Gashmir and Spruha!

Mumbai: Love is love and it’s the same for everyone (प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं) … This same kind of love was spread all over on the day of love which is on Valentine’s Day. The world was filled with red air and all corners spread the joy of being in love. On this day of love some love warriors were successful in winning their girlfriends heart while some weren’t… And the ones successful turned into couples. Along with these successful couples, one such new and unique couple is ready to win the hearts of the Marathi audience on this occasion of Valentine ’s Day.

And this unique couple is our very own…. Gashmir and Spruha…!

Indeed, this odd combination, Gashmir Mahajani and Spruha Joshi is ready to meet the audience through their upcoming Marathi movie produced under Filmy Keeda productions.

The name of the movie is still kept unrevealed. Recently the muhurat of the movie was commenced by the Producer P. S. Chhatwal. Also present were the co-producer of the movie Ravi Singh, Director Sameer Vidwans and other Artists of the film.

Speaking about this unique couple, Director Sameer Vidwans said “I found Spruha and Gashmir’s duo very apt for the topic. Spruha is a very nice friend of mine but we have never worked together, not even with Gashmir. Similarly, they both haven’t worked together. Till Double seat, even Mukta and Ankush hadn’t worked together. In the same way, this jodi’s chemistry will grow over the time and that is the need of the topic of the movie. I know I would have lots of fun working with them.”

S. Chhatwal & Reecha Sinha are the producers of the film & Ravi Singh is the Co-producer. Saurabh, Rishikesh & Jasraj Joshi will compose music of this family drama & Prasad Bhende is the DOP for this film.

What exactly will this Jodi bring forward for us will be known soon….

गश्मीर आणि स्पृहाचं प्रेम in the AIR…!’

मुंबई : प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं… हेच सेम – सेम प्रेम… प्रेमाच्या दिवशी म्हणजेच आपल्या ‘व्हॅलेन्टाईन्स डे’ ला सर्वत्र पसरलं होतं. सगळं जग गुलाबी झालं होतं… आणि चहूकडे प्रेमाचे वारे वाहत होते… या प्रेमदिनी काही प्रेमवीर आपल्या प्रेयसीचं मन जिंकण्यात यशस्वी झाले तर काही अयशस्वी ठरले… आणि यशस्वी प्रेमवीरांच्या जोड्या झाल्या. या प्रेमवीरांच्या जोड्यांबरोबरच आणखी एक हटके जोडी या दिवसाच औचित्य साधून मराठी मनांवर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.

ही जोडी आहे… गश्मीर आणि स्पृहाची

होय, गश्मीर महाजनी आणि स्पृहा जोशी हे ऑड कॉम्बिनेशन (odd combination) फिल्मी किडा प्रोडक्शन्स यांच्या आगामी मराठी चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. नुकताच या सिनेमाचा मुहूर्त चित्रपटाचे निर्माते पी. एस. छतवाल यांच्या हस्ते पार पडला. यावेळी चित्रपटाचे सह-निर्माते रवी सिंह, दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्याबरोबर इतर कलाकार मंडळी उपस्थित होती.

याविषयी बोलताना दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी, “स्पृहा – गश्मीर ही जोडी चित्रपटासाठी योग्य वाटल्याचे म्हटले. तर स्पृहा आपली चांगली मैत्रीण असूनही अद्याप तिच्यासोबत काम करता आले नाही… या चित्रपटाच्या निमित्ताने हा योग जुळून आला. डबल सीटच्या अंकुश आणि मुक्ताप्रमाणेच…गश्मीर आणि स्पृहानेही अजून एकत्र काम केलेलं नाही त्यामुळे शूटींगदरम्यान त्यांच्यात फुलत जाणारी केमिस्ट्री ह्या विषयाची गरज आहे. आणि ही केमिस्ट्री अनुभवणं नक्कीच मजेशीर असेल असा विश्वास समीर विद्वांस यांनी व्यक्त केला.”

या चित्रपटाची निर्मिती पी. एस. छतवाल आणि रीचा सिन्हा यांनी केली असून सहनिर्माते रवी सिंह आहेत. नात्यांची गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटासाठी सौरभ, ह्रषिकेश दातार आणि जसराज जोशी यांचं संगीत असणार आहे तर छायाचित्रदिग्दर्शन प्रसाद भेंडे यांचं आहे.

तर अशी ही, व्हॅलेन्टाईन्स डेच्या निमित्ताने आपल्यासमोर आलेली ही हटके जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने नेमकं काय घेऊन येत आहे… हे लवकरच कळेल…

Comments are closed.

logo
logo
Powered by WordPress | Designed by Elegant Themes